मराठी भाषेत गणित, विज्ञान, तंत्रज्ञान आदी अनेक विषयांतील नवीन पारिभाषिक
संज्ञा निर्माण करण्याचा प्रयत्नात सुचलेले प्रतिशब्द संग्रही करून
ठेवत आहे. तसेच मराठी भाषा पुढे नेण्याच्या प्रयत्नात सर्वांनी या चर्चांच्या
संदर्भात सुचवलेले शब्दही जोडले आहेत. कृपया येथे अनवधानाने ऋणनिर्देश राहून
गेला असल्यास मला विरोप पाठवा. हे शब्द मांडतांना अथवा तयार करतांना काही
सूत्रे पाळलीत. ती म्हणजे -
१. नवीन शब्दांत मूळ इंग्रजी शब्दाच्या उच्चारापेक्षा शक्यतो कमी अक्षरे असावी.
२. जोडाक्षरांचा वापर सहसा टाळवा जेणेकरून क्लिष्टता कमी वाटेल.
३. शब्दशः भाषांतराऐवजी अर्थवाही शब्दांच्या निर्मितीवर भर द्यावा.
४. नवीन शब्दांची नाळ मराठी वळण आणि लयीस जोडलेली असावी.
५. शक्यतो शब्द काव्यात्म असावा.
आता हा प्रयत्न किती जमलाय ते तुम्हीच ठरवा. हे शब्द म्हणजेच प्रमाण असा काही
माझा दावा नाही. हा केवळ एक प्रामाणिक प्रयत्न आहे. यातून मंथन होऊन जे अमृताचे
थेंब निघतिल ते मराठीच्या सागरात पडावे हीच सदिच्छा.
Indian team
Team details
- Email:
- Log in for email information.
All members
You must log in to join or leave this team.
Latest members |
Pending approval |